Tuesday 14 April 2015


   

 कधी तरी अनुभवून बघा.....

 १)   जो माणूस स्वतावर हसून स्वताच्या वागणुकीला हसून जीवन जगत असतो तो त्याच्या स्वत:च्या जीवनात जास्त दुखी नसतो.

२)    आपण जेव्हा दुसऱ्याला  मोहात पडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा  आपण अगोदरच कुणाच्या तरी मोहात पडलेलो असतो तेव्हाच  आपण दुसऱ्याच्या  मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो.

३)   आयुष्यातल खर सुख उपभोगायच असेल तर इतरांना मदत करायला शिका.... जरी ती व्यकी आपले उपकार विसरणारी असली तरी अश्या माणसाला मदत करून जर आपण स्वताच मन समाधानी करतो.... असाच माणूस खर्या अर्थाने समाज्याची सेवा करू शकत.

४)   एखाद्याचा आपण भर चौकात आपण आपमान करतो... आणि जेव्हा सर्वजण  त्याला हसत असतात  आणि आपल्याला असं वाटत कि मी काही तरी असं केलाय कि ज्याने, माझी मान उंचावेल...परंतु ह्या अपमानास्पद वाक्यांची खरी किंमत आपल्याला तेव्हा कळते......जेव्हा आपल्या सोबत असं घडतं आणि तेव्हा आपण मान खाली करून पुढे जातो...

५)   जी व्यक्ती स्पष्ट बोलते...आपले विचार  स्पष्टपणे सर्वांसमोर मांडते...अशा व्यक्ती च्या बोलण्यातून कधीच कुणाचं मन दुखावलं जात नाही...अशा व्यक्तीचा स्वीकार समाज नेहमीच करत असतो ...